
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडेत रिसॉर्ट भाड्याने देण्याच्या व्यवहारातून ६० लाखांची फसवणूक
रिसॉर्ट आणि बंगल्याच्या वरील मजला भाड्याने चालवण्यास देण्याच्या व्यवहारातून एका वृद्ध महिलेची आणि त्यांच्या कुटुंबाची तब्बल लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक के ल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीतील जयगड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात पुण्यातील बाणेर येथील मुकुंद माधव चाफेकर आणि आरती मुकुंद चाफेकर या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. याबाबत मोहना मनमोहन जोग (वय ६८, रा. नांदिवडे, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. जोग कुटुंबाचा नांदिवडे येथे जोग बंगला आणि रिसॉर्ट आहे. डिसेंबर २०२४ मध्ये संशयित आरोपी चाफेकर दाम्पत्याने जोग यांच्याशी संपर्क साधला. आपण राजकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तींच्या ओळखीचे आहोत, असे भासवून त्यांनी जोग कुटुंबाचा विश्वास संपादन केला. १० वर्षांच्या कराराऐवजी ५ वर्षांसाठी रिसॉर्ट आणि बंगल्याचा वरचा मजला भाड्याने घेण्याचे त्यांनी ठरवले. पाच लाख रुपये डिपॉझिट म्हणून देऊन आरोपींनी बंगल्याचा वरील मजल्याचा ताबा मिळवला. डिपॉझिटमधील अडीच लाख रुपये जिन्यासाठी खर्च करायला लावले. त्यानंतर साडेचार महिने करार करण्यास चालढकलपणा केला.
www.konkantoday.com




