दापोलीत पिग्मी एजंटच्या पैशांवर अज्ञाताने मारला डल्ला.

दापोली शहरातील गोपाळकृष्ण पतपेढीच्या पिग्मी एजंटच्या पैशावर अज्ञाताने डल्ला मारल्याची घटना गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळकृष्ण पतपेढीचे पिग्मी एजंट संदेश रविंद्र गांधी (५०) यांनी २० नोव्हेंबरला सुमारे ४९ हजार ५० रुपये एवढी रक्म जमा केली. ही रक्म एका छोट्या बॅगमध्ये भरून ते पैसे भरण्यासाठी २१ रोजी पतपेढीत आले.

पैशांची बॅग टेबलावर ठेवून पैसे भरण्यासाठी ते स्लीप काऊंटरवर जावून भरत होते. तेव्हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने टेबलावर ठेवलेली ४९ हजार ५० रुपये रक्कम असलेली बॅग चोरून नेली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ) प्रमाणे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button