ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन


जेष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे मंगळवारी रात्री निधन झाले ते ९३ वर्षांचे होते.त्यांच्या या अकाली निधनाने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पन्नालाल सुराणा यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत झाला. मात्र त्यांचे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्याच्या आसू गावात अनेक वर्षे वास्तव्य होते. ते शालेय वयातच राष्ट्रसेवा दलात दाखल झाले. तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण भूदान चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली, त्यांनी प्रसिद्ध मराठवाडा दैनिकाचे संपादक म्हणूनही काम पाहिले.सुराणा यांनी अनेक शेती, शिक्षणासाह अनेक सामाजिक समस्यांवर विपुल लेखन केले. समाज प्रबोधन संस्थेचे आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. अनेक पुरोगामी संघटना,चळवळी उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button