महिला पोलीस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू, पोलीस पतीला मध्यरात्री अटक, बहिणीनं केला गंभीर आरोप


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अखेर एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्मिता माने यांचे पती आणि स्वतः पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या सचिन माने याला कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेमुळे पोलीस दल आणि संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जंगल भागात आढळला होता मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून महिला हवालदार स्मिता माने या बेपत्ता होत्या. त्या कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे त्या कुठे गेल्या, याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्हता. मात्र दोन दिवसानंतरत्यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे येथील दाट जंगलात गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पाठवला.दरम्यान, मृतक स्मिता माने यांच्या बहिणीने दिलेल्या अधिकृत तक्रारीनुसार, पती सचिन माने हा सातत्याने स्मिता यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. याच सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली किंवा हा घातपात करून त्यांची हत्या करण्यात आली, असा तीव्र संशय मृतकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button