गार्डनमध्ये स्वच्छता गृह बंधनकारक करा : युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत

रत्नागिरी : शहरातील सार्वजनिक उद्यानांमध्ये स्वच्छता गृहाची सोय नसल्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे. त्यामुळे सर्व गार्डनमध्ये स्वच्छता गृहाची सोय करण्यात यावी, अशी मागणी युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ-संध्याकाळ शेकडो नागरिक फिरायला, व्यायामाला गार्डनमध्ये येतात; मात्र बहुतांश गार्डनमध्ये स्वच्छता गृह नाही. असलेले स्वच्छता गृह बंद किंवा अस्वच्छ अवस्थेत आहे. त्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गार्डनमध्ये जास्त वेळ थांबता येत नाही.
यावेळी बोलताना प्रसाद सावंत म्हणाले, “गार्डन हे नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी आहे. तिथे स्वच्छता गृहाची चांगली सोय असणे गरजेचे आहे. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, ही आमची विनंती आहे.”

प्रत्येक गार्डनमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह असावे, तिथे पाणी, वीज आणि रोज स्वच्छता असावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय असावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नगरपाललकेने यावर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर उपाययोजना करावी, असे प्रसाद सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button