भाटीमिर्‍यातील अपूर्ण बंधार्‍याविरोधात ग्रामस्थ पतन कार्यालयावर धडकणार


रत्नागिरीतील भाटीमिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधारा अपूर्ण आहे. खाजगी मालकीच्या जागेमध्ये बंधा-याचे काम होत आहे. अशा अनेक घडामोडींकडे लक्ष वेधण्यासाठी भाटीमिर्‍या कृती संवर्धन नासमिती पतन कार्यालयावर धडक देणार आहे. याच बंधार्‍याच्या ठिकाणी पायर्‍या बांधण्यासाठी वापरण्यात आलेले स्टील गंजलेले असल्याचाही आरोप कृती संवर्धन समितीच्या सदस्यांनी केला आहे.
मिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम गेले अनेक वर्षांपासून रखडले आहे. भाटीमिर्‍या ग्रामस्थांनी आवाज उठविल्यानंतर मध्येच कामाला सुरूवात होते आणि काही दिवसांतच काम थांबले जात असल्याचे भाटीमिर्‍या कृती संवर्धन समितीचे सदस्य नागेश कांबळे, सुनिल कांबळे, दत्तगुरू कीर, छोट्या भाटकर, बावा नार्वेकर, पप्या कीर, रवी आलीम, दिनेश भाटकर, संजय पिलणकर, भिकाजी कांबळे, श्रीराम कांबळे, आशिष भाटकर, अजित भाटकर यांनी सांगितले. मिर्‍या बंधारा हा सुमारे साडेतीन कि.मी.चा असून भाटीमिर्‍या येथील अपूर्ण कामाबाबत, खाजगी मालकीच्या जागेमध्ये बंधारा केला जात असल्याबाबत पतन विभागाकडे यापूर्वी ग्रामस्थांनी लक्ष वेधले. परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणीही केली जाणार आहे. गुरूवारी सायंकाळी ही समिती पतन विभागाच्या कार्यालयावर धडक देणार असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button