
सागरी वारसा, संधी आणि शास्वत विकास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा.
शिरगाव मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, रत्नागिरी मे. मरीन ’ सिंडीकेट लिमिटेड, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव आणि जलजीविका रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी दिन साजरा करण्यात आला यानिमित्त ’सागरी वारसा, संधी आणि शास्वत विकास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आणि सागरी नौकानयन प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, नागपूर मत्स्य विज्ञान महाविद्यालय माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. एस. चांडगे, भाटये नारळ संशोधन केंद्र माजी प्रमुख डॉ. दिलीप नागवेकर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी शहर अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, यूएनडीपी-जीसीएफ इसीआयआरसीसी प्रकल्प जिल्हा समन्वयक सहयोगी ऋषीकेश भाटकर, मे. मरीन सिंडीकेट लिमिटेड, मरिनर दिलीप भाटकर, संचालक, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मे. मरीन सिंडीकेट लिमिटेड संचालक संज्योक्ती सुर्वे आदी उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, समुद्र ही आपल्या कोकणासाठी आणि देशासाठी सुद्धा नैसर्गिक देणगी असून देशाच्या विकासासाठी महत्वाचा हातभार लावत असून सक्षम प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. कॅ. भाटकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मे. मरीन सिंडीकेटतर्फे गेली ३६ वर्षे रत्नागिरीमध्ये सागरी दिन साजरा केला जात असून त्यापैकी ३६ वर्षे कोकण कृषी विद्यापीठाची मत्स्य विद्या शाखा आपल्यासोबत असल्याची आठवण करून दिली. डॉ. श्रीरंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सागरी दिनाचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी उत्कृष्ट सागरी प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजनाबाबत प्रशंसा केली.
मत्स्य तंत्रनिकेतनचे गिअर टेक्निशियन डॉ. एस. सी. कांबळे यांनी ५४ मत्स्य प्रजातींसाठींच्या किमान कायदेशीर आकारची माहिती दिली. संजीव लिमये यांनी रत्नागिरीतील सागरी पर्यटनविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन अपूर्वा सावंत तर आभार डॉ. आर. आर. जाधव यांनी मानले.www.konkantoday.com




