
वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली
जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या अमानुष वागणुकीविरोधात राजकीय पक्षाकडून टीका केली जातेय. आता विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिलीय. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहेमी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून आता महाराष्ट्राच्या गल्लीतही बंदचा संताप पाहायला मिळतोय.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
केंद्र सरकारने भारतीय नागरिकांवरच हल्ला घडवून आणला. हेच सरकार होतं, ज्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेगवेगळी नावे दिली आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अर्बन नक्षली देखील या सरकारनं म्हटलंय.दिल्लीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनाला अहिल्यानगरच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. रिमझिम पावसातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंबेडकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले. ‘मोदी हटाव देश बचाव’, ‘हम क्या चाहते आझादी’, ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.




