
मंडणगड तालुक्यातील माहू गावठाणवाडी येथे मनोरुग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्यू.
मंडणगड तालुक्यातील माहू गावठाणवाडी येथे एका ८० वर्षीय मनोरुग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मनीषा चाँडु बैंकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजण्यापूर्वी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे