
चाकरमान्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाची 21 ठिकाणी केंद्रे
रत्नागिरी : जिल्ह्यातील महामार्गावर प्रवास करणार्या नागरिकांना आपत्तीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी विशेष आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येत आहेत. एकूण 21 ठिकाणी ही आरोग्य तपासणी केंद्र असणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होते. या वेळी अपघात होऊन जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. यात तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी खेड – हॉटेल अनुसयाजवळ, हॅप्पी धाब्याजवळ, भरणे नाका, भोस्ते घाट. चिपळूण – सवतसडा, कळंबस्ते फाटा, बहादूरशेख नाका, खेर्डीनाका, कापसाळ, अलोरे, सावर्डे. संगमेश्वर – आरवली, तुरळ, गोळवली. देवरूख फाटा, मुर्शी. रत्नागिरी – हातखंबा तिठा, पाली. लांजा – वेरळ, कुवे गणपती मंदिर. राजापूर – राजापूर बसस्थानक ही केंद्र असणार आहेत.