खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील काही रासायनिक कारखान्यांकडून सोनगाव परिसरात पुन्हा रसायनमिश्रित पाणी

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील काही रासायनिक कारखान्यांकडून सोनगाव परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ आणि मच्छीमारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून संबंधित कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रविवार १२ जुलै रोजी दुपारी ही घटना घडल्याची माहिती मच्छीमार पदाधिकार्‍यांनी दिल्यानंतर कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचे समन्वयक भरत लब्ध्ये व तुळशीराम पवार यांनी तातडीने सोनगाव येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळावरून पाण्याचे नमुने गोळा केले तसेच ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेत या सोडण्यात आलेल्या पाण्याचे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे. या पाहणीवेळी सोनगावच्या सरपंच भारती पडवळ मच्छीमार नेते दिलीप दिवेकर, मंगेश कासेकरे (धामणदिवी), प्रकाश दिवेकर, स्वप्निल विनायक पडवळ, कासेकर यांच्यास अनेक ग्रामस्थ स्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button