️नितीन गडकरींचा नवा दावा.. ‘आता मी हवेत उडणारी बस आणणार’, सोशल मीडियावर मिम्सना उधाण!

Nitin Gadkari Flying Bus claim and his reaction to E20 petrol : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच नवनवीन कल्पना मांडत असतात. त्यांच्या कल्पनांची अनेकदा सोशल मीडियावर खिल्लीही उडवली जाते.

इथेनॉल इंधनाबाबत सध्या देशभरात संभ्रमाचे वातावरण असताना नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नवा दावा करत चर्चेला तोंड फुटले आहे. आपण लवकरच हवेत उडणारी बस आणणार आहोत, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ-कानपूर द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत असताना गडकरी यांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीची नवी कल्पना मांडली.

‘एका कोपऱ्यातून दुसरीकडे कधी पोहोचलो कळणारही नाही’

या कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी म्हणाले, “मी लवकरच हवेत उडणाऱ्या बसेस सुरू करणार आहे. यापूर्वी मी पाण्यावर उतरू शकणारी सीप्लेन्स आणली होती. मी स्वतः एका विमानातून समुद्रात उतरलो होतो. माझ्या मंत्रालया अंतर्गत, विजेवर चालणारी एक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम विकसित करणार आहे. यामुळे लोकांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगात प्रवास करणे शक्य होईल. आपण इतक्या कमी वेळात कसे पोहोचलो, हे लोकांच्या लक्षातही येणार नाही.”

उडणारी बस इथेनॉलवर चालवणार का? विरोधकांची टीका

हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या एक्स हँडलवरून नितीन गडकरी यांच्या दाव्यावर उपरोधिक टीका करण्यात आली आहे. पक्षाने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, “हवेत उडणारी बस इथेनॉलपासून तर चालणार नाही ना? नाहीतर ई२० इंधनाप्रमाणे या गाड्या हवेत झटका देतील.” ही टीका केल्यानंतर जेएमएमने नितीन गडकरी यांच्या दाव्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

ई२० इंधनावर काय म्हणाले?

ई२० पेट्रोल (२० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन) देशभरात लागू करण्याच्या मुद्द्यावरून सध्या टीका होत आहे. या इंधनामुळे वाहनांची कार्यक्षमता क्षीण होऊ शकते, असा आरोप होत आहे. या टीकेला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, इथेनॉल मिश्रित इंधनामुळे समस्या निर्माण झालेले एक वाहन दाखवून द्या.

‘शुद्ध पेट्रोल हवे तर अधिक पैसे मोजा’

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी पेट्रोल पंपांवर ई१० पेट्रोल मिळण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, ज्यांना इथेनॉल ब्लेंड पेट्रोल नको आहे, ते १०० टक्के पेट्रोल वापरू शकतात. मात्र त्यांना यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील.

सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

नितीन गडकरी यांच्या हवेत उडत्या बसच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मिम्स शेअर केले आहेत. या गमतीशीर मिम्समधून भविष्यातील बस सेवा कशी असेल, याची कल्पना लोकांनी केली आहे.

हवा में उड़ने वाली बस,”गड़करी टूर एंड ट्रैवल्स कंपनी” देश के एक कोने से दूसरे कोने तक सफ़र को आसान बनाये।

एक बारिश में उद्घाटन किया हुआ हाईवे ढह जाता है,भाजपा का सिद्धांत साफ़ है भ्रष्टाचार करते जाओ और मंच से जोक मारते जाओ।

कॉक्रोच जनता पार्टीच्या बिहार राज्याच्या एक्स हँडलवरूनही अशाचप्रकारचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button