
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ-जांभळ्याची कोंड येथे पहुडलेल्या पट्टेरी वाघाचे दर्शन.
चौकुळ-जांभळ्याची कोंड (ता. सावंतवाडी) येथील पुलाखालील बाजूला दुपारच्या सुमारास पट्टेरी वाघ पं. स. माजी सदस्य संदीप गावडे यांच्या नजरेस पडला. त्यांनी तो क्षण आपल्या कॅमेर्यामध्ये टिपला. आंबोली-चौकुळ परिसरात एकूण दोन पट्टेरी वाघ असल्याची माहिती पुढे येत आहे. यात एक म्हणजे नांगरतास देवाच्या पुढे सीमा परिसरात तर दुसरा याच ठिकाणी हा पट्टेरी वाघ अनेकांना दिसला. वाहन चालकांना याच ठिकाणी कधी पाण्यात तर कधी येथील दगडांवर बसलेला दिसला, असे येथील ग्रामस्थ सांगतात.दुपारच्या सुमारास हवेत उष्मा वाढल्याने हा वाघ जवळपास एक ते दोन तास जांभळ्याची कोंड येथील पुलाखालील पाण्यात पहुडला होता. याच दरम्यान चौकुळ येथून फणसवडे येथे जाणारे संदीप गावडे आणि त्यांच्या सहकार्यांना हा वाघ नजरेस पडला. त्यांनी गाडीतून उतरत त्याची छबी कॅमेर्यात कैद केली. यावेळी येथून जाणारे येणारे प्रवासी, ग्रामस्थांनी वाघाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.www.konkantoday.com