
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली, विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते, रामराव वडकुते यांना संधी
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते, रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यसभेचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या सुरू असतानाच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. भाजपनं विनोद तावडे यांचे तिकीट निश्चित केलं आहे. आता भाजपचे आणखी तीन उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू असतानाच भाजपने रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांची नावे घोषित केली.विनोद तावडे राज्यसभेवर जात आहेत. त्यांनी 1985 ते 95 हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलं. ते 1995 पासून भाजपामध्ये ते सक्रिय आहेत. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तर मुंबई भाजपाचा अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले.
ते विधान परिषदेचे 13 वर्ष सदस्य राहिले आहेत तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम पाहिल आहे. 2014 मध्ये बोरीवली मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले भाजपा शिवसेना सरकारमध्ये शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं त्यांचं तिकीट कापलं होतं.
बिहार, मध्यप्रदेशातील यशाचं बक्षीस
विधानसभेच तिकीट कापल्यानंतरही त्यांनी संयम कायम ठेवला 2019 पासून भाजपा संघटनेत केंद्रीय पातळीवरती सक्रिय झाले अनेक राज्यांच्या विधानसभा प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली गेल्या पाच वर्षात बिहार मध्यप्रदेश मध्ये प्रभारी म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली




