पेट्रोलची गरजच नाही, २५ रुपये लिटर इंधनावर धावणार कार! नितीन गडकरींची मोठी घोषणा!

Nitin Gadkari 25 Rs Petrol Claim : देशात ऑक्टोबर महिन्यात पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी कार बाजारात आणली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या कारसाठी पेट्रोलची अजिबात गरज भासणार नाही. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, इंधनाचा दर प्रति लिटर सुमारे २५ रुपये असल्यास अशा गाड्यांचा चालवण्याचा खर्च पेट्रोल गाड्यांच्या खर्चाच्या बरोबरीचा असू शकतो.

‘२५ रुपये प्रति लिटर’ हा आकडा दोन दाव्यांवर अवलंबून आहे. पहिला म्हणजे इथेनॉलचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे आणि दुसरा म्हणजे कारची हायब्रिड प्रणाली कार धावताना स्वतःची ६० टक्क्यांपर्यंत वीज निर्माण करते.

टोयोटो कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांची ‘स्ट्रॉन्ग-हायब्रिड’ प्रणाली एकूण वेळेपैकी सुमारे ६० टक्के वेळ इंजिन बंद ठेवून आणि एकूण अंतरापैकी सुमारे ४० टक्के अंतर ‘इलेक्ट्रिक मोड’वर कापू शकते, परंतु हे केवळ विशिष्ट चाचणी परिस्थितींमध्येच शक्य आहे, दैनंदिन वापरामध्ये नाही.

यात इथेनॉलच्या वापरामुळे प्रत्यक्ष कार्यक्षमतेत होणारी घट विचारात घेतली पाहिजे. खुद्द गडकरी यांनीही यापूर्वी मान्य केले आहे की केवळ E20 इंधनामुळे मायलेजमध्ये २ ते ६ टक्क्यांची घट होऊ शकते. तसेच, पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाडीच्या बाबतीत प्रत्यक्ष रस्त्यावरील कामगिरीची आकडेवारी काय असेल, हे गाडीची स्वतंत्रपणे चाचणी होईपर्यंत एक अनुत्तरित प्रश्नच राहील.

गडकरी यांनी सांगितले की, त्यांना ऑक्टोबरमध्ये टोयोटाच्या ‘इनोव्हा फ्लेक्स-फ्यूल’ कारच्या लाँचिंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही कार १०० टक्के इथेनॉलवर धावण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यांनी असा दावा केला की, ही कार धावताना ६० टक्के वीजही निर्माण करेल.

जगातील १९ देशांमध्ये इथेनॉलचा वापर

बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार गडकरी म्हणाले, “जगातील १९ देशांमध्ये इथेनॉलचा वापर केला जात आहे आणि आज भारतात कोणत्याही वाहनाबाबत त्याबद्दल तक्रार आलेली नाही. ऑक्टोबरमध्ये मला टोयोटाच्या इनोव्हा कारच्या लाँचिंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहे, जी १०० टक्के फ्लेक्स-फ्यूलवर चालेल.”

गडकरी म्हणाले की, भारतात इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या वाहनांबाबत आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा ई२० पेट्रोलमुळे इंधन कार्यक्षमता आणि इंजिनच्या कामगिरीवर होणाऱ्या परिणामाबद्दल नागरिक आणि लोकप्रतिनिकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button