
कुडाळ तालुक्यातील अणाव गावात गव्यांचा हैदोस,दोन दुचाकीस्वारांना गवारेड्यांच्या कळपाची धडक.
कुडाळ तालुक्यातील अणाव गावात गव्यांचा हैदोस सुरूच आहे. पणदूर-सुकळवाड मार्गावरील अणाव-रताळे या भागात मंगळवारी (१८) रात्री साडेसातच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांना गवारेड्यांच्या कळपाने धडक दिली.यात तीन युवकांना दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पणदूर नजिक अणाव भागात गेले काही दिवस गवा रेड्यांचा लोकवस्तीलगत मुक्तसंचार सुरू आहे.
मंगळवारी सायंकाळी पणदूर-अणाव-सुकळवाड मार्गावर पणदूर नजिक अणाव रताळे भागात अचानक रस्त्यावर आलेल्या गवा रेड्यांचा कळप तेथून जाणा-या दोन दुचाकींना धडकला. यात दुचाकीस्वारांसह तिघेजण जखमी झाल्याचे समजते. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे