अट्टल चोरट्याला जळगाव येथून अटक

लांजा : डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या चोरीचा लांजा पोलिसांनी तपास लावताना या चोरीतील अट्टल चोरट्याला जळगाव येथून अटक केली आहे. रविवारी २९ जानेवारी रोजी उशिरा त्याला लांजा पोलीस ठाण्यात आणले. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना ही डिसेंबर २०२२ मध्ये लांजा बस स्थानकात घडली होती. लांजा बसस्थानकात एस.टी. बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या हातातील अडीच तोळ्याची सोन्याची बांगडी कुणाल सुनील गायकवाड (३९ वर्षे, रा. अंबरनाथ, ठाणे) या अट्टल चोरट्याने कटरच्या सहाय्याने बांगडी तोडून लंपास केली होती. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या सराईत चोरट्याचा लांजा पोलिसांकडून माग काढला जात होता.कुणाल गायकवाड हा अट्टल चोरटा जळगाव येथे असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील, पोलीस हेड. कॉन्स्टे. सचिन भुजबळराव, कॉन्स्टेबल प्रथमेश वारिक, मंगेश कोलापटे यांच्या पथकाने जळगाव येथे जावून या सराईत चोट्याला ताब्यात घेतले. या चोरट्याला घेवून लांजा पोलिसांचे पथक रविवारी २९ जानेवारी रोजी लांजा पोलीस ठाण्यात दाखल झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button