
महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या प्रवासाला; दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार
मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिली आहे.मुंबईतून मान्सून साधारणपणे 8 ऑक्टोबरला परततो. यंदा मात्र मान्सून पाच दिवस आधीच मुंबईतून परतला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील काही भागांतही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनची माघार सुरू झाली असली तरी काही ठिकाणी परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.




