Tata करणार लवकरच मोठा धमाका, पेट्रोल वापरायची गरजच नाही, आणतेय E100 वर धावणारी CAR!

Tata Motors : भारतात एकीकडे इंधन दरवाढ आता अटळ आहे. केंद्र सरकारने ३ रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुद्धा केली आहे. एकीकडे केंद्रापासून ते राज्यापर्यंत काटकसरीला सुरुवात झाली आहे.

असं असताना आता पेट्रोल आणि डिझेलवर रामबाण तोडगा टाटा मोटर्सने काढला आहे. टाटा मोटर्सकडून आता फ्लेक्स फ्युल वाहनाची तयारी सुरू केली आहे. ही कार E20 आणि E100 इंधनावर चालणार आहे. या वर्षीच्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला ही कार लाँच होण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सने आता फ्लेक्स फ्यूलवर वाहन निर्मितीकडे पाऊल टाकलं आहे. भारत सरकारच्या राय इथेनॉल ब्लेंडिग धोरणाच्या आधारावर ही घोषणाा केली आहे. यामध्ये क्रुड इंधनाचा कमी वापर आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरण वाढीवर भर दिला जात आहे. टाटा मोटर्सने या आधी 2025 मध्ये भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये Punch Flex Fuel प्रोटोटाइप लाँच केली होती. ही पंच वेगवेगळ्या इथेनॉल मिक्सवर धावू शकते.

टाटा मोटर्सने अद्याप या टेक्नॉलॉजीवर काम करण्यासाठी तयार आहे आणि फ्रेमवर्क तयार होत आहे. लवकरच याचं प्रोडक्शन सुरू होणार आहे. टाटा मोटर्सने जर ही कार लाँच केली तर ऑटो इंडस्ट्रीमध्ये हे क्रांतीकारक पाऊल ठरणार आहे

काय आहे फ्लेक्स फ्यूल टेक्नोलॉजी?

E85 हे एक फ्लेक्स-फ्युल (Flex-Fuel) आहे, याामध्ये 85 टक्के इथेनॉल आणि 15% पेट्रोल मिक्स असणार आहे. सध्या भारतात E20 पेट्रोल वापरणे बंधनकारक आहे. यामध्ये इथेनॉलचं प्रमाण 20 टक्के आहे, E85 यामध्ये मोठा बदल करणार आहे. हे एक वेगळं फ्युल ग्रेड असेल. आता टाटा मोटर्स ही अशी कार आणत आहे, जे E20 (20 टक्के इथेनॉल), E85 (85 टक्के इथेनॉल) आणि E100 (प्युअर इथेनॉल)वर सुद्धा धावू शकते. यामध्ये खास वस्तूपासून तयार झालेले फ्यूल सिस्टम, इंजेक्टर्स आणि सेन्सर्स वापरले जाणार आहे.

E100 इंधन नेमकं आहे काय?

E100 इथेनॉल हे मुळात ऊस आणि मका, गहू यांचा वापर करून तयार होतं, शेतामध्ये बॉयोगॅस सारखाच हा प्रकार आहे. यामुळे जळताना कार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक वायूंचे प्रमाण खूप कमी असतं. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण, ऊस, मका, आणि खराब धान्याला चांगला भाव मिळेल. या प्रयोग यशस्वी झाला तर भारताला कच्च्या तेलाची आयात कमी करावी लागेल.

Tata Punch असणार पहिले मॉडेल

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा पंच ही पहिली फ्लेक्स फ्यूलवर धावणारी कार ठरणार आहे. ऑटो एक्सपो 2025 मध्ये या कारची झलक पाहण्यास मिळाली होती. या पंचमध्ये 1.2 लिटर इंजिनचा वापर केला होता, जो हाय इथेनॉल ग्रेडला सपोर्ट करतोय. पंच ची लोकप्रियता पाहूनच टाटा मोटर्सने हा निर्णय देतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button