
अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका
महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरड्या घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय.गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतकऱ्यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर हतबल झाले. राज्यातील संकटात असेलेल्या शेतकरी प्रश्नावर अमित शाह एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व करणारेही मूग गिळून गप्प बसले हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा घोर अपमान असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.




