’सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला अधिकृत मंजुरी, पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाला बूस्टर डोस


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने बहुप्रतिक्षित ’सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला अधिकृत मंजुरी दिली आहे. सन २०२६-२७ ते २०२८-२९ या तीन वर्षांच्या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार असून, दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या प्रत्येक जिल्ह्यास प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
पूर्वीची सिंधुरत्न योजना संपुष्टात आल्यानंतर कोकणातील लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी ही योजना नव्या स्वरुपात सुरू ठेवण्याची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती. त्यानंतर शासनाने सुधारित स्वरुपातील ’सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ मंजूर करून कोकणाच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button