
रत्नागिरी जिल्ह्यातील ५,७२९ रेशनकार्ड होणार रद्द
रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ’मिशन सुधार’ या मोहिमेची घोषणा करण्यात आली असून, या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ७२९ बनावट शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा आणि अंत्योदय योजनेचा लाभ केवळ खर्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक सधन आणि अपात्र व्यक्ती या कल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत आहेत, ज्यामुळे पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर बनावटगिरीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ही पडताळणी अन्न व नागरी पुरवठा विभाग मोहीम युद्धपातळीवर होती घेण्यात आली आहे.
प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण २३,५७४ रेशनकार्डाची कसून पडताळणी केली जात आहे. यामध्ये दुबार नोंदणी झालेली १,५५३ कार्डे आणि आधार क्रमांक जोडणी नसलेली म्हणजेच संशयास्पद वाटणारी ४,१७६ कार्डे अशी एकूण ५,७२९ रेशनकार्ड थेट रद्द करण्याची मोठी कारवाई केली जाणार आहे.www.konkantoday.com




