बावनदीत पडलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह सापडला; चार दिवस सुरू होती शोधमोहीम


संगमेश्वर : बावनदी रेवाळेवाडी येथील महेश नारायण भरणकर वय ४२ यांचा मृतदेह नदीत बेपत्ता झाल्यानंतर चौथ्या दिवशी पुलाजवळ सुमारे तीनशे मीटर अंतरावर नदीपात्रात आढळून आला. शुक्रवारी सकाळी महेश भरणकर हे बावनदीच्या जुन्या पुलावर बसले असताना त्यांचा तोल जाऊन ते नदीत पडले होते. या घटनेनंतर सलग चार दिवस त्यांचा शोध सुरू होता.

अखेर सोमवारी त्यांचा मृतदेह पुलापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर आढळून आला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीपात्र आणि आजूबाजूच्या परिसरात सातत्याने शोधमोहीम राबविण्यात आली. या संयुक्त प्रयत्नांमुळे चौथ्या दिवशी मृतदेहाचा शोध लागला. या दुर्दैवी घटनेमुळे बावनदी परिसरात हळहळ व्यक्त होत असून महेश भरणकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button