नद्या, ओढ्यांमध्ये विद्युत प्रवाहाने मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करा, क्रांती व्यापारी संघटनेची मागणी


कोकणातील नद्या, ओढे आणि जलस्त्रोतांमध्ये वाढत असलेल्या पर्यावरणविरोधी प्रकारांबाबत देवरुख क्रांती व्यापारी संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या प्रकारांना तात्काळ आळा घालण्यासाठी संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अलिकडच्या काळात काही भागांमध्ये मोरचुद (कॉपर सल्फेट) व इतर रासायनिक पदार्थांचा वापर करून मासेमारी करणे, करंटच्या साहाय्याने मासे पकडणे तसेच खेकडे पकडण्यासाठी गावातील जलबंधारे आणि पाणी अडवणार्‍या संरचना उद्ध्वस्त करण्याच्या घटना समोर येत आहेत. हे प्रकार केवळ बेकायदेशीर नसून संपूर्ण जलपरिसंस्था, जैवविविधता आणि ग्रामीण जलसुरक्षेसाठी अत्यंत घातक असल्याचे क्रांती व्यापारीने म्हटले आहे.
मोरचुद आणि इतर रसायनांच्या वापरामुळे मोठे मासे, लहान पिल्ले, अंडी, खेकडे, कोळंबी, बेडूक तसेच यामुळे नदीतील नैसर्गिक अन्नसाखळी इतर अनेक जलचरांचा मृत्यू होतो. विस्कळीत होऊन जैवविविधतेचे मोठे होणारी मासेमारी देखील तितकीच नुकसान होते. करंटच्या साहाय्याने धोकादायक असून यात सर्व प्रकारचे जलचर बाधित होतात.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button