सूत्रसंचालन कला आत्मसात करण्याची सुवर्णसंधी!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिपळूण शाखेतर्फे उद्या एक दिवसीय कार्यशाळा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने सूत्रसंचालन कार्यशाळा उद्या रविवारी दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात बांदल हायस्कूलच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडणार असून ज्येष्ठ अभिनेते आणि लोकप्रिय सूत्रसंचालक विघ्नेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रसंचालनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सूत्रसंचालन ही फक्त ओळख करून देण्याची कला नसून, कार्यक्रमाचे शिस्तबद्ध व आकर्षक सादरीकरण घडवून आणण्याची जबाबदारी असते. यात आवाजाची पट्टी, योग्य शब्दांची मांडणी, मंचावरील वावर, भाषणातील नेमकेपणा, श्रोत्यांना बांधून ठेवण्याची कला या विविध पैलूंवर प्रशिक्षण दिले जाईल.

या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी https://forms.gle/ZPFa847hd9GMde228 लिंकवर जाऊन आपले अर्ज भरावेत.

नोंदणीसाठी व कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी ९४०४१५८९१० आणि ९४२१६२०१७४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. कार्यशाळेचे शुल्क रुपये १००० इतके असून, मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

विघ्नेश जोशी हे मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शनवरील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या सहजसुंदर अभिनयासह उत्तम आवाज, नेमकी वाणी आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची हातोटी यामुळे ते सूत्रसंचालन क्षेत्रातही तितकेच नावाजले गेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ कार्यशाळेतील सहभागींना होणार आहे.

चिपळूणसह कोकणातील नवोदित सूत्रसंचालक व रंगकर्मींसाठी ही कार्यशाळा मोठी संधी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button