मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी सुसज्ज AQUA STENTOR E-Tug या बोटीची केली पाहणी


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट, उरण येथे बंदर विकास तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज AQUA STENTOR E-Tug या बोटीची पाहणी केली. या वेळी कॅप्टन बाळासाहेब व्ही. पवार (उप संरक्षक-सागरी), श्री डिंगमन व्हॅन (वॉर्डन एरिया सेल्स-डेमेन शिपयार्ड) आणि श्री अरुण सिन्हा (व्यवस्थापकीय संचालक-अलर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड) उपस्थित होते.

पारंपरिक डिझेल टग बोटीच्या तुलनेत अनेक सोयीसुविधा प्रदान करणारी ही नवी इलेक्ट्रिक टग बोट कमी ध्वनी प्रदूषण, कमी वायू प्रदूषण आणि कमी खर्चात अधिक जलद सेवा प्रदान करते. बंदरातील जहाज खेचणे म्हणजेच टोईंग, मोअरींग तसेच अग्निशमन सेवा देणे या महत्त्वाच्या कामांसाठी ही बोट कार्यरत राहणार आहे. यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्टचे कार्य अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल तसेच राज्यातील बंदर क्षेत्राला एक नवी बळकटी मिळेल.

AQUA STENTOR E-Tug बोट पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टमसह सुसज्ज असून तिची कार्यक्षमता अधिक आणि ऊर्जा खर्च कमी आहे. या बोटीत आधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण उपकरणे बसवली असून ती पर्यावरणपूरक व शांत कार्यप्रणालीमुळे विशेष ठरते. स्वच्छ जलपर्यटनासाठी ही बोट आदर्श मानली जात असून सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक फायर फाइटिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. पूर्ण भार असतानाही या बोटीला 12.0 नॉट्स इतका वेग गाठता येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button