खासगी ट्रॅव्हल्सच्या बसना मुंबईच्या वेशीवरच रोखणार; घरी जाण्यासाठी मेट्रो, बेस्ट आणि कॅब, दहिसर नाक्यावर थ्री स्टार हॉटेल, पार्किंग हब आणि फूड प्लाझा


राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून आणि देशभरातून मुंबईत दररोज येणाऱ्या हजारो खासगी ट्रव्हल्समुळे होणारी प्रचंड वाहतूककोंडी फोडण्यासाठी या गाड्या मुंबईच्या वेशीवर म्हणजे जकात नाक्यावर थांबवण्यात येणार आहेत.या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी मेट्रो, बेस्ट आणि कॅबची सुविधा कनेक्ट करून दिली जाणार आहे. मुंबईच्या वेशीवर उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दहिसर नाक्यावर थ्री स्टार हॉटेल, पार्किंग हब, फूड प्लाझा उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिका सुमारे 1232 कोटींचा खर्च करणार असल्याची माहिती आज पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेले जकात नाके 2017 मध्ये बंद करण्यात आल्यामुळे दहिसर आणि मानखुर्द जकात नाके ओस पडले आहेत. त्यामुळे या दोन्ही जकात नाक्यांवर सोयीसुविधांसह थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल, शॉपिंग सेंटर, पार्किंग हब अशा सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आता देशभरातून येणाऱ्या पॅसेंजर गाडय़ांना दहिसर व मानखुर्द चेकनाक्यांवरच रेड सिग्नल मिळणार आहे. या पॅसेंजर गाडय़ा या ठिकाणी हॉल्ट घेऊन पुन्हा परतीला जातील, असे आयुक्त अश्विनी भिडे
यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button