कोकणातील तरूण नोकरीसाठी पुणे-मुंबईकडे धाव घेतो ही परिस्थिती थांबली पाहिजे -आ. प्रवीण दरेकर


चिपळूण निसर्गसंपन्न कोकणची भूमी सुपिक आहे. मात्र इथला तरूण नोकरीसाठी मुंबई पुण्यासारख्या शहराकडे धावतो, ही परिस्थिती थांबली पाहिजे, तरूणांनी इथेच राहून आपल्या मातीत व्यवसाय सुरू केला पाहिजे. तो चाकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा, रोजगार देणारा उद्योजक झाला पाहिजे. पुढील काळात सहकाराच्या माध्यमातून त्यासाठी आपणा सर्वांना अधिक जोमाने काम करावे लागेल, इथे पाच मॉडेल प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. तयासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. मुंबई बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करू, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांना दिली. तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयासाठी सहकाराचे विभागीय प्रशिक्षण केंद्र चिपळूमध्ये तुमच्या इथे स्थापन करू, अशात देखिल आ दरेकर यांनी दिला.
शहरातील बहादरलेख नाका येथील सहकार भवन सभा हात रविवारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या ७८ व्या अभिष्टचिंतन सोहोळा भव्यदिया स्वरूपात पार पडला. हा सोहोळा खर्‍या अर्थाने कोकणच्या सरकार चळवळीला बळ आणि त्यातून नवसंजीवनी देणारा ठरला. आ. प्रवीण दरेकर यांचा श्री. सुभाषराव चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आ. प्रवीण दरेकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, जिल्हा विकास अधिकारी अनिल कळंद्रे, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जिजाबा पवार, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, चिपळूण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोय साबळे, संचालिका सौ. निता प्रयाण, ऍड. नयना पवान, संचालक अशांक पादन, गुलाब सुर्वे, सत्यवान म्हामुणकर, सोमा गुडेकर, राजेश वाजे, रविंद्र भोसले, प्रकाश साळवी यांच्या कार्याचे कौतूक केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button