
राज्यात पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण पण अद्याप 800 प्राध्यापकांची पदे रिक्तच
** राज्यातील 43 शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापकांची वानवा आहे. पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असतानादेखील अद्याप 800 प्राध्यापकांची पदे रिक्तच असून, ती अद्याप भरलेली नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.राज्यामध्ये 43 शासकीय तंत्रनिकेतन आहेत. मात्र, त्यातील जवळपास सर्वच शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गेली काही वर्षे अधिव्याख्यात्यांच्या जागाच भरलेल्या नाहीत. राज्यात पॉलिटेक्निकमध्ये 60 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र, शिकवण्यास प्राध्यापकच नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.