
पावस जिल्हा परिषद गटातील ४० शेतकऱ्यांना २०० किलो रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे वाटप

रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील मावळंगे मंडळ येथे पावस जिल्हा परिषद गटाचे सदस्य ॲड. महेंद्र वसंत मांडवकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात एकूण ४० शेतकऱ्यांना २०० किलो बियाणांचे वाटप करण्यात आले. यासाठी पंचायत समिती पावस नामदेव कोकरे यांनी कृषी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी सागर मासाळ, सरपंच सौ. नम्रता बिर्जे, सहाय्यक कृषी अधिकारी डी. डी. राऊत, शिवसेना शाखा प्रमुख विकास तावडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधर थूळ (भाऊ), शांताराम चंदुरकर, विलास वारीशे, युवासेनेचे विकेश गुरव, निलेश गजने आदी उपस्थित हजर होते.
या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळेत मदत होणार असून, उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना चांगल्या पिकासाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात शासनाच्या ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी कृषी अधिकारी आणि जिल्हापरिषद सदस्य व दोन्ही पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे आणि स्वाती शिंदे एकत्र मिळून चांगले काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ॲड. मांडवकर यांनी केले.




