मासे पकडण्यासाठी गेलेल्या ताम्हणमळ्यात नदीत पडून वृद्धाचा मृत्यू


मासे पकडण्यासाठी गेलेल्या वसंत विठ्ठल कातळकर (६५, ताम्हणमळा, ता. चिपळूण) त्यांचा पाण्यात पडून कापसी नदीत गुळवणी फाटा जवळील पुलाच्या खाली मृत्यू झाल्याची घटना ६ रोजी घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर सुरेंद्र राजाराम कातळकर यांनी दिली आहे. वसंत कातळकर हे कापसी नदी येथे एकटेच मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असताना पाण्यात पकडून त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button