सरकारी नोकरीसाठी ‘गेट’ परीक्षा!

नोकरीची संधी : GATE 2027 या परीक्षेसाठी IIT मद्रास ही ऑर्गनायझिंग इन्स्टिट्यूट आहे. देशभरातील 23 IITs; 31 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) आणि 4 इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (IIITs) (पुणे, बंगलोर, हैद्राबाद आणि भुवनेश्वर); IISc बंगलोर, 7 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISERs) (पुणे, भोपाळ, मोहाली, तिरूपती, कलकत्ता, तिरूअनंतपुरम् आणि बेरहामपूर) मधील मास्टर्स (ME/M.Tech.) आणि डॉक्टोरल (Ph.D.) प्रोग्राम्स इन इंजिनिअरींग/सायन्स/कॉमर्स/आर्ट्सच्या प्रवेशासाठी आणि/किंवा MoE आणि इतर गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स/असिस्टंटशिप्स मिळविण्यासाठी GATE ही पात्रता परीक्षा आहे.

काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज (PSUs) (जसे की AAI, BHEL, ECIL, GAIL, HAL, IOCL, NTPC, NPCIL, ONGC, PGCIL इ.) इंजिनिअरींग मॅनेजमेंट ट्रेनी पदांवरील भरतीसाठी आणि देशभरातील व परदेशातील अनेक विद्यापीठामधील उच्च शिक्षणासाठी GATE स्कोअर ग्राह्य धरला जातो.
केंद्र सरकारमधील ग्रुप-ए पदांवर सिनियर फिल्ड ऑफिसर (टेली), सिनियर रिसर्च ऑफिसर (CRYPTO)/S & T भरती GATE स्कोअर आधारित केली जाते.

AICTE मान्यता प्राप्त इन्टिटयूटस् आणि AICTE मान्यता प्राप्त युनिव्हसिटी डीपार्टमेंटस मधून ME.M.Tech., M.Arch, साठी GATE /GPAT स्कोअर आधारित प्रवेश घेणा-या उमेदवारांना दरमहा रु.12,400/- ची पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलशिप दिली जाते.
व्हॅलिड GATE स्कोअर आधारित थेट Ph.D. साठी प्रवेश घेणा-या उमेदवारांना पहिल्या दोन वर्षी दरमहा रु.37,000/- आणि पुढील 3 वर्ष दरमहा रु.42,000/- फिनान्शियल असिस्टन्स दिला जातो.
GATE 2027 स्कोअर रिझल्ट जाहीर झाल्या दिवसापासून 3 वर्षेपर्यंत वैध असेल.

GATE 2027 परीक्षा एकूण 30 विषयांसाठी आयोजित केली जाईल. (2027 पासून रोबोटिक्स अँड ऑटोमेशन (RA) या नवीन विषयाचा समावेश केला आहे.)
ह्युमॅनिटिज अँड सोशल सायन्स (XH) या पेपरमध्ये पुढील विषयांची परीक्षा घेतली जाते. इंग्लिश, इकॉनॉमिक्स, लिंग्विस्टिक्स (भाषाशास्त्र), फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, सोशिऑलॉजी.यापैकी कोणताही एक ऑप्शनल सबजेक्ट निवडता येतो.

IIT मद्रास, कानूपर, खरगपूर आणि बॉम्बेमध्ये ह्युमॅनिटिजमधील मास्टर्स अँड डॉक्टोरल प्रोग्राम्ससाठी प्रवेश दिले जातात.
GATE 2027 परीक्षा दिनांक 6, 7, 13, 14, 20, 21 फेब्रुवारी 2027 रोजी (प्रत्येक दिवशी दोन सेशन्समध्ये) देशभरातील (झोनल सेंटर्समधील) शहरातील केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.

GATE 2027 साठी IIT बॉम्बे झोनमध्ये अहिल्यानगर (अहमदनगर), अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर (औरंगाबाद), बारामती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, मुंबई-ठाणे, नवी मुंबई-रसायनी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर-पंढरपूर, वसई-पालघर, वर्धा इ. केंद्रांचा समावेश आहे. (उमेदवारांनी आपल्या IIT Zone मधील 3 शहरांना परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा).
पात्रता – पदवीच्या तिसऱया किंवा त्यापुढील वर्षात शिकणारे किंवा इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी/आर्किटेक्चर/सायन्स/कॉमर्स/आर्ट्स/ ह्युमॅनिटीजमधील पदवी उत्तीर्ण उमेदवार GATE 2027 साठी पात्र आहेत. तसेच एमबीबीएस/बीडीएस/बीव्ही.एससी./बी.एस्सी (अॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉटेस्ट्री) पदवी उत्तीर्ण किंवा 5/6/7 किंवा त्यापुढील सेमिस्टर्समध्ये शिकणारे उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

पुढील 7 प्रोफेशनल सोसायटीज/इन्स्टिट्यूशन्समधील इंजिनिअरींग पदवी समतूल्य परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार GATE 2027 साठी पात्र आहेत. दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) (IE), दी इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हील इंजिनिअर्स (ICE), दी इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअर्स (IETE), दी एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (AeSI), दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स (IIChE), दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटल्स (IIM) आणि दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअर्स (IIIE).
BA/BCom /B.Sc. चे IITs आणि IISc मध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

GATE-2027 परीक्षेसाठी कोणतीही वयाची अट ठेवलेली नाही.
परीक्षा पद्धती – GATE 2027 चे सर्व विषयांचे पेपर्स पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतील, ज्यात (i) मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स (MCQ), (ii) मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन (MSQ) आणि (iii) न्यूमरिकल ॲन्सर टाईप (NAT) अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल.

उमेदवारांना दिलेल्या जोड विषयांतील यादीतून एक किंवा दोन विषय निवडता येतील.(दोन विषयांसाठी सुध्दा एकच फॉर्म भरावयाचा आहे).
विषयवार गुणांची विभागणी अशी असेल – आर्किटेक्चर आणि प्लानिंग (AR), केमिस्ट्री (CY), डेटा सायन्स अॅन्ड आरटीफिशीयल इन्टेलिजन्स (DA), इकॉलॉजी आणि इव्हेल्यूशन (EY), जीओमॅटिक्स इंजिनीअरिंग (GE), जीऑलॉजी आणि जीओफिजिक्स (GG), मॅथेमॅटिक्स (MA), फिजिक्स (PH), ह्युमॅनिटिज अँड सोशल सायन्स (XH), स्टॅटिस्टिक्स (ST), रोबोटिक्स अँड ऑटोमेशन (RA) आणि लाईफ सायन्सेस (XL) पेपर्ससाठी जनरल ॲप्टिट्यूड – 15 गुण विषयासाठी 85 गुण, एकूण 100 गुण.

वरील विषय वगळता इतर विषयांसाठी – जनरल ॲप्टिट्यूड – 15 गुण इंजिनिअरींग मॅथेमॅटिक्स – 13 गुण विषयावरील प्रश्नांसाठी 72 गुण, एकूण 100 गुण.
प्रत्येक पेपरसाठी 180 मिनिटांचा कालावधी असेल. प्रश्न 1 किंवा 2 गुणांसाठी असतील. MCQ type प्रश्नांच्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या 1/3 गुण वजा केले जातील. MSQ/NAT type प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

काही संस्थांमध्ये फक्त GATE-2027 च्या स्कोअरवर आधारित प्रवेश दिले जातील. काही संस्थांमध्ये प्रवेश GATE-2027 मधील कामगिरी (70… वेटेज) आणि ॲडमिशन टेस्ट/इंटरह्यूमधील कामगिरीवर (30… वेटेज) देवून दिले जातील.
GATE ऑनलाइन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) वेबसाईट https://gate2027.iitm.ac.in/ वर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 27 ऑगस्ट 2026 पासून सुरूवात होणार आहे. GATE-27 संबंधित सर्व पुढील अपडेटस् या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले जातील.

अर्जाचे शुल्क – प्रत्येक पेपरसाठी महिला/अजा/अज/दिव्यांग – रु. 1,000/-, इतरांसाठी – रु. 2,000/-.
ऑनलाइन अर्ज विनाविलंब शुल्काशिवाय दि. 27 सप्टेंबर 2026 पर्यंत भरता येतील.
विलंब शुल्कासह (रु. 500/-) ऑनलाईन अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत भरता येतील.

ऑनलाइन अर्जात काही बदल करण्याची अंतिम तारीख दि. 21 ऑक्टोबर 2026.
ॲडमिट कार्ड https://gate2027.iitm.ac.in/ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.
GATE-2027 परीक्षेचा निकाल दि. 19 मार्च 2027 रोजी जाहीर होईल.

स्कोअर कार्ड विनामूल्य डाऊनलोड करण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल..

शंकासमाधानासाठी फोन नं. 044-22578200, ई-मेल helpdesk@gate.iitm.ac.in

GATE 2027 चे रजिस्ट्रेशन ‘DigiLocker’ ने करणे अनिवार्य आहे.
दिनांक : 25 ऑगस्ट 2026 सुहास पाटील 9892005171

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button