ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चिपळूणच्या विरेश्वर तलावालातील मासे अचानकपणे मृत झाल्याची झाल्याची घटना


चिपळूणच्या विरेश्वर तलावालातील मासे अचानकपणे मृत झाल्याची झाल्याची घटना घडली असून चिपळूण नगरपरिषदेकडून तलावात बोट फिरवून हे मासे पाण्याबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. हे मासे कोणत्या कारणास्तव मृत पावले असावेत याचा शोध घेतला जात असून त्यासाठी तलावातील पाणी नमुने देखील घेण्यात आले आहे. दरम्यान, निसर्ग, पक्षीप्रेमींनी याबाबत संताप व्यक्त  केला जात आहे. विरेश्वर तलावाची जपणूक व्हावी यासाठी काही वर्षापूर्वी या तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. यातूनच हे शहराच्या वैभवात भर टाकणारे ठरले होते. काही दिवस जाता तलावाची देखभाल न झाल्याने या तलावाची पडझड झाली आहे. या तलावात मगर, मासे, कासवे मोठ्या प्रमाणात हे तलाव एकप्रकारे आहेत. नुकतीच या तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे. यातूनच झाडी-झुडपाने वेढलेला हा तलाव चकाचक दिसू लागला आहे. असे असताना सोमवारी अचानकपणे तवालातील मासे मृत होऊन ते पाण्यावर तरंगताना आढळून आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button