आमदार भास्कर जाधव बनले बसचे चालक तर आमदार शेखर निकम बसचे प्रवासी


एसटी महामंडळाकडून चिपळूण येथील आगाराला ५ नवीन एसटी बसेस देण्यात आल्या. आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते या नवीन गाड्यांचे लोकार्पण श्रीफळ वाढवून करण्यात आले.आमदार जाधव यांनी शहरात बस चालवून प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे या नवीन एसटी बसकडे लक्ष वेधून घेतले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला १० नवीन बसेस पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे चिपळूण आगाराला ५ बसेस मिळाल्या आहेत. अजून ५ बसेस लवकरच दाखल होणार आहेत. बीएस ६ मॉडेलच्या या एसटी बसेस आकर्षक व तितक्याच दमदार आहेत. या पाचही बसेस चिपळूण आगारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रांगोळी काढत व पेढे वाटून आनंद साजरा केला. यानंतर आमदार जाधव व निकम यांच्या हस्ते या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार जाधव यांनी एसटी बस चालवून शहरातून फेरफटका मारला. यावेळी आमदार निकम हेही प्रवासी म्हणून बसमध्ये उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button