
मंत्री भरत गोगावले यांनी घेतले रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाचे दर्शन
राज्याचे फलोत्पादन व खारभूमी मंत्री भरत गोगावले हे आज शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्त रत्नागिरीत आले होते रत्नागिरीत आल्यावर त्यांनी रत्नागिरी चे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार राजन साळवी, बिपिन बंदरकर, खेडेकर, राजन शेटे व विकास मयेकर व भैरी देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते गोगावले यांनी श्री देव भैरीबुवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला गोगावले यांचे भैरी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले