
रत्नागिरी जिल्ह्यातील ६६ बालकांना मिळाले नवे आयुष्य
रत्नागिरी जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविण्यात येणार्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (आरबीएसके) माध्यमातून व्यापक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. सन २०२६-२७च्या जुलै अखेरच्या अहवालानुसार अंगणवाडी आणि शाळांमधील हजारो बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, विविध आजारांवरील उपचारांसह ६६ शस्त्रक्रियाही यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.
अहवालानुसार, जिल्ह्यातील २,९१३ अंगणवाड्यांपैकी २,२९३ अंगणवाड्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. या अंगणवाड्यांमध्ये आढळलेल्या ५१ हजार ६१८ बालकांपैकी ३९ हजार ३४२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळांच्या बाबतीत २,९३१ शाळांपैकी १,१८५ शाळांची तपासणी पूर्ण झाली असून, १ लाख ९० हजार ३०४ विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ८८० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.




