
खानू येथील ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त नौसैनिक अरुण आठल्ये यांचे दुःखद निधन
खानू येथील ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये यांचे शनिवारी दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. सैन्यातील निवृत्तीनंतर त्यांनी पत्रकार क्षेत्रात काम केले होते जिल्ह्यातील नामवंत दैनिकातून त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले होते त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे.त्यांच्यावर खानू मध्ये उद्या दिनांक 30 ऑगस्ट रोजी. 8.00वाजता होतील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




