
टिळक आळी शतक महोत्सव जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटनटिळक आळीतील (रत्नागिरी) श्री मारूती – गणपती पिंपळपार देवस्थानतर्फे आयोजन.
रत्नागिरी : शहरातील श्री मारूती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथे २७ ते २९ जून या कालावधीत आयोजित केलेल्या टिळक आळी शतक महोत्सव जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल (२७ जून) रोजी झाले.ही स्पर्धा टिळक आळीतील भगिनी मंडळ हॉल, गणपती मंदिरा जवळ सुरू आहे. उद्घाटन प्रसंगी टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, विश्वस्त अरुण करमरकर, स्पर्धा प्रमुख मनोहर केळकर, विश्वस्त मंदार खेर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये, तसेच टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, जिल्हातील कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे
१) राहुल भस्मे / मुक्तानंद वरवडेकर विजयी विरूद्ध कुंदन खातु / राहुल रेडीज (१२-१०,१०-०९)
२) राहुल कदम / निलेश निवळकर विजयी विरूद्ध स्वप्निलराजे शिंदे / ओंकार मोरे ( १५-०३, १०-१५, २५-०८)
३) विजय कोंडविलकर / दामोदर घाणेकर विजयी विरूद्ध संतोष जोगळेकर / अमोघ जोगळेकर ( ११-१३, १४-१०, २५-००)
४) योगेश साठ्ये / निनाद देसाई विजयी विरूद्ध आझीम जहागिरदार / जाकीर जहागिरदार ( ११-०५, ०८- ०२)
५) रियाज अकबर अली / अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध पवन भोई / अर्थव भोई ( १४-००, १४-००)
६) सुरज आडीवरेकर / वरुण वरक ( ०५-०४, ००-०९, २५-००)
७) सुनील जाधव / विशाल ओतारी विजयी विरूद्ध निलेश गोळे / राजेश मोरे (१२-०८,१४-००)
८) संजय कोंडविलकर / योगेश कोंडविलकर विजयी विरूद्ध विवेक देसाई / अल्ताफ मुन्शी ( १०-०८, १५-१०)