मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरात रस्त्यांवर सण-उत्सवांत फटाके फोडण्यास केली बंदी


सण-उत्सवांच्या काळात वाढणार्‍या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कानठळ्या बसविणार्‍या आवाजातील डीजे, डॉल्बी आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध घालण्याचे स्पष्ट केले आहे. लेझर लाईट्सच्या वापराबाबतही न्यायालयाने मर्यादा घालण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपिठासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत हे निर्देश देण्यात आले. न्यायालयाने फटाक्यांच्या निर्मितीवर किंवा विक्रीवर बंदी घातलेली नाही. या व्यवसायावर अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचे नमूद करत न्यायालयाने संबंधित प्रकरणांवर भाष्य करणे टाळले. मात्र, फटाके योग्य ठिकाणीच फोडले जातील, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button