त्या एसटी चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

रत्नागिरी : शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू कोंड्या आखाडे (वय ५५) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (१३ मे) दुपारी अडीचच्या सुमारास एसटी बसस्थानक येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शैलेंद्र कमालाकर चव्हाण (वय ५०) यांचे वडिल कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२) हे मेडिकलमधून आपल्या आजारपणाच्या गोळ्या घेऊन परत घरी जाण्यासाठी एसटी डेपोत जात असताना भाट्ये रस्त्यावरून डेपोत येणारी बस (क्र. एमएच-१४ बीटी २७५७) वरील संशयित चालक बापू आखाडे यांनी एसटी निष्काळजीपणे चालवून कमलाकर चव्हाण यांना धडक दिली. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या दोन्ही पायांवरून चाक गेले.या अपघातामध्ये कमलाकर चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button