परशुराम घाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनरचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू!


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कंटेनरचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने केमिकलचे ड्रम वाहून नेणारा कंटेनर थेट डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. यावेळी लोटे येथे कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराला कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

लोटे येथून केमिकलने भरलेले ड्रम घेऊन कंटेनर जात असताना परशुराम घाटात अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेला. याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनर आणि दुचाकी दोन्ही रस्त्याखाली कोसळले.

या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button