
लोटे एमआयडीसीला दोन धरणातून पाणी देणार -आ. प्रमोद जठार
खेड तालुक्यातील लोटे येथील उद्योग तरुणांना रोजगार देत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवणे आपले काम असून त्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी या उद्योगांना खोपी-शिरगाव व नातूनगर धरणातून पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करीत असून चिपळूण शहराला पूरमुक्त करण्यासाठी गाळ काढण्याच्या कामाचा आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच नगरपरिषदेला निधी आणून देण्याचे काम आपण करू, अशी ग्वाही आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी येव आयोजित पत्रकार परिषदेत दिली.




