अनेक दिवस रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारीपदी भाऊसाहेब गलांडे

गेले काही दिवस रिक्त असलेल्या रत्नागिरी अप्पर जिल्हाधिकारी पदी आता भाऊसाहेब गलांडे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. त्यांची नियुक्ती होण्याआधी ते पुणे येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत होते. तसेच त्यांनी पुणे उपविभागीय अधिकारी म्हणून काम सांभाळले होते. काही महिन्यांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम करत असणारे शंकर बर्गे यांची जात पडताळणी विभाग अध्यक्ष म्हणून पदोन्नती झाली होती. मात्र त्यानंतर काही दिवस रिक्त असणार्‍या पदाचा अतिरिक्त पदभारही बर्गे यांनी स्वीकारला होता. मात्र दरम्यान बर्गे यांच्या वैद्यकीय कारणांमुळे हे पद रिक्त होते. आता या पदावर गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button