राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्टेशनजवळील बोगद्याजवळ रेल्वे लाईन वर मृतदेह आढळला.

राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्टेशनजवळील बारेवाडी बोगद्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० वर्षे वय असलेला हा पुरुष रेल्वेच्या धडकेत मरण पावला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.ही घटना १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सौंदळ रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील मैल दगड क्रमांक २५८/१ ते २५८/२ च्या दरम्यान बारेवाडी बोगद्याजवळ हा मृतदेह आढळला. कोणत्यातरी रेल्वेची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे घटनास्थळावरून दिसत आहे.याबाबतची माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि अज्ञात व्यक्ती म्हणून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button