देवरुख-रत्नागिरी मार्गावर डंपर-ओमनीचा भीषण अपघात


देवरुख-रत्नागिरी मार्गावर देवरुखनजीकच्या पूर येथील धोकादायक वळणावर आज बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. डंपरने एका मारुती ओम्नी कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे डंपर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ओम्नीमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

देवरुख ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्याचा सल्ला दिला आहे. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयाच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
डंपर आणि ओम्नीच्या या भीषण धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button