
रेल्वे फाटक बंद करूनच रेल्वे मार्गस्थ, कोकण रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण.
चिपळुणातील कळंबस्ते येथे २२ फेब्रुवारी रोजी गट नंबर २० येथील गेटमनला वंदेभारत रेल्वे येत असल्याची सूचना मिळताच त्यांनी गेट बंद करण्याची प्रक्रिया केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे खाली आलेले गेट पूर्णतः लॉक झाले नाही परंतु गेटमनने पर्यायी व्यवस्था म्हणून असलेल्या स्लायडिंग बूमच्या सहाय्याने गेट बंद करून रेल्वे मार्गस्थ केल्याचे स्पष्टीकरण कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी दिले आहे.या रेल्वे फाटकाबाबत कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केलेले आरोप रेल्वेकडून खोडून काढण्यात आले आहेत.
रेल्वे फाटक उघडे राहून चिपळूण येथे दोन धावल्याबाबतच्या वृत्ताबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना रेल्वेचे प्रबंधक बापट म्हणाले, २२ फेब्रुवारी रोजी चिपळूण गेट क्रमांक २० येथील गेटमनला वंदेभारत रेल्वे मार्गस्थ होणार असल्याची सूचना मिळाली. सूचना मिळताच त्यांनी गेट बंद करण्याची प्रक्रिया केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे खाली आलेले गेट पूर्णतः लॉक झाले नाही. अशा स्थितीत गेट लॉक न झाल्यास गेटपासून २०० मीटरवर असलेले सिग्नल कार्यान्वित होतात. याच पद्धतीने सिग्नल कार्यान्वित झाले आणि गेटपासून सुरक्षित अंतराच्या आधीच वंदे भारत थांबली.www.konkantoday.com