प्रदूषणाच्या कारणावरून लोटेतील चार कारखान्यांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश

लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने नियमांची पायमल्ली करून प्रदूषण खात्याचे नियम पाळत नसल्याने या परिसरात प्रदूषण होण्याचा अनेक प्रकार होत आहेत .काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील आयनी तुंबाड खाडीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याने त्या ठिकाणी अनेक मासे मृत झाले होते. याबाबत ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यावर त्यांच्या पथकाने लोटे औद्योगिक वसाहतीत पाहणी केली त्यानंतर श्रेयस ,गोदरेज, श्रीया केमिकल्स व क्रोमॅटिक इंडिया या चार कारखान्यांवर कारवाई करत या कारखान्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button