
दोन षटकार टोलावले, तिसरा मारण्याआधी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वसईत क्रिकेट खेळताना घडली दुर्देवी घटना.
क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसईच्या कोपर गावांतील सागर वझे हा 27 वर्षाचा तरुण गावात, गावातील टीमसोबत मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मात्र सागर हा चांगला क्रिकेट खेळत असल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी दोन चेंडूवर दोन षटकार मारले आणि तिसरा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच कोसळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.सागरला वझेला अगोदर देखील हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा डॉक्टरने त्यास क्रिकेट खेळाण्यास मनाई केली होती. मात्र क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला.
सागरची फलंदाजी येताच त्याने दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले मात्र तिसरा षटकार ठोकत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानावर कोसळला त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केलं. तरुण वयातच या मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा आता खेळ पाहता येणार नसल्याने या परिसरातील क्रिकेट प्रेमी व खेळाडूनी हळहळ व्यक्त केली.