नावात “महिला” असलेल्या विद्यालयात आणखी एका शिक्षकाचा कारनामा, शाळेतील विद्यार्थिनींना पाठवले अश्लील मेसेज.

-नावात “महिला” असलेल्या विद्यालयात आणि एका शिक्षकाचा कारनामा केल्याची तक्रार पालकांनी केली आहे या शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवण्याची पालकांची तक्रार आहे तू फार सुंदर आहेस… तू मला आवडतेस… शाळेच्या बाहेर मला भेट… अशा आशयाचे मेसेज करणारा आणखी एक लंपट शिक्षकाचा कारनामा त्याच विद्यालयात उघडकीस आला आहे. ३ मुली त्या शिक्षकाविरोधात पुढे आल्या आहेत.

याविरोधात मंगळवारी काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली. मात्र आपले बिंग फुटलेय, आपले काही खरे नाही हे लक्षात आल्यानंतर तो शिक्षक शाळेतून पसार झाला. रत्नागिरीच्या व शिक्षण क्षेत्रातील संस्कृतीला काळीमा फासणारे प्रकार रत्नागिरीत उघडकीस येऊ लागले आहेत. गुरु शिष्याचे पवित्र नाते बदनाम करणारे प्रकार घडत आहेत एकाच शाळेत दोन वासनांध शिक्षकांचे कारनामे उघड झाल्यानंतर आता पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.पहिला प्रकार सोमवारी उजेडात आला. लागवडीचे शिक्षण देणारा शिक्षक गुलाबाची कलमे कशी बांधायची? याचे धडे देत असतानाच नको ते वर्तन करणाऱ्या शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत त्याला मार खावा लागला.

सध्या हा शिक्षक पोलिसांच्या ताब्यात आहे ही घटना ताजी असतानाच अन्य एक प्रकार उघडकीस आला आहे. नव्या शिक्षकाचे काही मेसेज पालकांच्या हाती लागले. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी मंगळवारी थेट शाळेकडे धाव घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यादेखील पालकांसमवेत होत्या. काही पालकांनी ते मेसेज वाचून दाखवले. तू फार सुंदर आहेस, शाळेच्या बाहेर भेटायला ये, अशा आशयाचे मेसेज असल्याचे सांगण्यात आले.

या शिक्षकाने काही मुलींना अश्‍लिल मेसेज केले होते, ही बाब आता कालच्या प्रकारानंतर पुढे आली आहे. तसेच याबाबत वाच्यता केल्यास तुम्हाला नापास करेन, अशी धमकीदेखील दिल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शाळेत पालक आलेत, आता आपली काही खैर नाही, हे लक्षात आल्यानंतर शाळेत उपस्थित असलेला शिक्षक गाडी तेथेच टाकून शाळेतून पसार झाला. त्या शिक्षकाबाबत विचारणा केली असता तो रजेवर असल्याचे पालकांना सांगण्यात आले.

सोमवारप्रमाणेच मंगळवारीदेखील पालक संतप्त होऊन शाळेत आले होते. शाळा व्यवस्थापनाला त्याची माहिती मिळाल्यानंतर शाळेत पुन्हा गोंधळ होणार, हे पाहून व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधून जादा कुमक मागवून घेतली. शहर पोलिसांचे एक पथक शाळेत दाखल झाले होते.यावेळी त्या शिक्षकाला काही पालकांनी कॉल केला, तुम्ही ताबडतोब शाळेत या, तुमचे प्रताप आम्हाला कळले आहेत. आमच्याकडे तुमचे मेसेज आहेत, असे फोनवरुन त्या शिक्षकाला पालकांनी सांगितले. मात्र त्या शिक्षकाने तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे फोनवरुन सांगितले. त्यामुळे पालक अधिकच संतापले.

या प्रकारानंतर पालक आणि व्यवस्थापन समिती यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी व्यवस्थापन समिती चौकशी करून या नव्या शिक्षकावर कारवाई करेल, असे सांगण्यात आले. मात्र पालकांचे त्याबाबत समाधान झाले नाही. त्या शिक्षकाला आमच्या समोर आणा असा पवित्रा पालकांनी घेतला होता.मंगळवारी शाळेत आलेल्या पालकांनी त्या वादग्रस्त शिपायाबाबत तक्रारी केल्या.एकामागोमाग एक सलग दोन दिवस शिक्षकांचे करनामे उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अजून असे अनेक प्रकार उघडकीस येतील, असा संशयदेखील काही पालकांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांची भरती झाली त्यावेळी कोणती गुणवत्ता पाहून भरती करण्यात आली? असेदेखील पालकांचे म्हणणे आहे. ‘

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button