संगमेश्‍वर शहर परिसरात बिबट्याचा बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण.

संगमेश्‍वर शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याचे प्रत्यक्ष काहींना दर्शन झाल्याची चर्चासुद्धा आहे. या बिबट्याची भटकंती छत्रपती संभाजीनगरपर्यंत सुरू असून जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने येथील दातू कुष्टे यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला.गेले काही दिवस बिबट्या शहरासह लोकवस्तीच्या ठिकाणी स्वैर भटकंती करत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची भक्ष्य शोधार्थ भटकंती शहरी भागासह लोकवस्तीच्या ठिकाणी सुरू असून शहरातील श्‍वानांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते बिबट्याचे शिकार झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही वाहनचालकांना शहरातील अंतर्गत रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने वाहनचालक भयभीत झाले असून बिबट्याच्या भीतीमुळे रात्रीची वाहन वर्दळ सुद्धा रोडावली आहे.

यापूर्वी वनभाग सोडून भररस्त्यात तसेच गाव वाडीच्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचेच नव्हे तर अनेकांना दर्शन झाल्याचे ऐकिवात आहे. मात्र आता गजबजलेल्या शहरी भागतही बिबट्याने एन्ट्री मारली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button